साक्ष
इतिहासाने द्यावी कधी साक्ष
आमूच्या हातून असे काही घडले?
सांप्रतात केले कोणते असे कार्य की
वर्तमानही शरमिंदा अम्हास लाजले.
इतिहासाची चाळली तेव्हा पाने
अक्षरात काळ्या काय शिकलो?.
प्रश्नपत्रिकेतील उत्तरासोबत नाते
फक्त गुनाकार कराया रे झगडलो!
ओळखले होते आम्ही आमूचेच्
लायकीचे गूण अरे ठायी ठायी!
यशासाठी न झूंजता पडलो देवच्या
मंदिरात कधी कधी जगात रे पायी
चौसष्ट योनीनंतर म्हणतात की
माणसाला जन्म मानवाचा भेटतो!
मानव होता होता मानसाचा कसा
पशू होण्यास कितीसा वेळ लागतो?
- निलय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा