आईची लेकरे...
आम्ही लेकरे लेकरे आईच्या डोळ्यातील तारे,
डावपेच मांडूनी स्वप्नांशी हाती झेलतो निखारे...
आईच्या कुशीत लपूनी झेपावतो आकाशी ,
असुनी पोरसवदा आम्ही भिडतो गगनाशी.
गावाकडली पोरं आम्ही नाहीच साधीसुधी,
बापाच्या डोळ्यात पाणी तव पूजतो आधी.
आम्ही लेकरे लेकरे आईच्या डोळ्यातील तारे...
लौकिक आमुचा आम्हा आम्हालाच ख्याती,
उरात वसती गर्व आणी विश्वास अंत:पाती.
अंधाराला चिरुनी जाऊ प्रकाशातही न्हाऊ,
अग्नीकूंडी सचेत विरूनी दावू बाणा लढाऊ.
आम्ही लेकरे लेकरे आईच्या डोळ्यातील तारे...
शिकू नाही नूसतेच् आम्ही घेतला एक वसा,
वयस्कांना करू साक्षर आहे तयांचा भरवसा.
येणारी पिढी घाली उज्वल भविष्याची साद,
नसेल कोणी साव आणी कोणाची फरियाद.
आम्ही लेकरे लेकरे आईच्या डोळ्यातील तारे...
जिंकणेच मंजूर अता कोणास करु शिकस्त?
ठावूक झुंज आम्हाला जिंकणे जिंकणे फक्त.
उचलोनी पाऊल विशाल लांघतो गाव वेस,
सावधान करितो तुम्हा पेटलो आम्ही इरेस.
आम्ही लेकरे लेकरे आईच्या डोळ्यातील तारे...
- निलय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा