मंगळवार, २७ मे, २००८

जमलंच नाही ..! जमलंच नाही ..!

जमलंच नाही ..! जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…

रोज संध्याकाळी तिला
चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत
स्वतःला हरवायला ,

वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

आपल्यालाही आवडलं असतं...
पण जाऊ दे जमलंच नाही ..!


कधीतरी तिच्यासह बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

आपल्यालाही आवडलं असतं…
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

तिचा हात हळुवारपणे आपल्या
हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट
गाणं गायला ,

सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

आपल्यालाही आवडलं असतं…
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

निघता निघताच तिला
बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,

माझे अश्रू माझ्या
डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..

आपल्यालाही आवडलं असतं…
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
जमलंच नाही ..! जमलंच नाही ..!

अनामिक...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: