विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळी मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळी मागतं
मातृभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं
वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मातृभूमीकडेच वळतात
काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
आसिफ, औरंगाबाद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा