आयुष्याचं मुल्यांकन
आयुष्याचा उत्कर्ष हवा असेल तर घर सोडाव लागतं... सोप असत घरी राहणं... वडीलाच्या नावावर स्वत:च ओळखपत्र तयार करणं आणी मग ते ओळखपत्र आपलच अशी स्वत:ची (गैर)समजुत कळत नकळत करुन घेणं... मग हळू हळू स्वत:ची ओळख विसरायची अन सोयीस्करपणे वडीलोपार्जित चालत आलेल्या ओळखीचा मुखवटा घालुन मिरवायचं.
मला नेहमीच एक प्रश्न पडतो की हा आयुष्याचा संघर्ष कशासाठी अन सुखातला जिव दुख:त टाकायचा कशाला?
आता "आयुष्याचा संघर्ष " म्हणजे 'स्वत:च स्वत:साठी स्वत:ने केलेला संघर्ष' हीच माझी व्याख्या... थोडं स्पष्ट करुन संगायचं झालं तर 'या जगात स्वत:च्या व्यक्तीमत्वाचं अन आयुष्याचं मुल्यांकन स्वत:ला हवं त्याप्रमाणे पण 'अर्थ' अन 'चारित्र्य' यांच्या तुलनेत करणे'.
इंग्रजीत एक म्हण आहे, 'Respect should not be demanded it must be commanded'... याचचं मराठीत थोड स्पष्टीकरण द्यावयाचं झालं तर 'कोणी आपला आदर करावं ही अपेक्षा नसावी तर आपली स्वत:चीच गरज असावी'.
मी काही नैय्यायिक वगैरे बोलत नाही पण एक मासाचा गोळा स्वत:च्या मनाने त्याला आकार देत या जगाच्या बाजारात विकायला काढतो... एकाच वातावरणात वाढलेले... कदाचीत एकाच साच्यातून निघालेले तरीही भौतीक विश्वात त्यांच मुल्यांकन वेग-वेगळ असणारा देह...
मग हे ज्यानं त्यानं आपापलं ठरवायचं की लोखंड व्हावं कि सोनं व्हावं.
- निलय
1 टिप्पणी:
sunder vichar aahet
टिप्पणी पोस्ट करा