सोमवार, ५ मे, २००८

दाखला

दिसणारा हर एक जण परका वाटला होता
ओळखी पुसायचा मी घाट घातला होता

कधी होणार समतल ही जातींची उतरंड
तसा शबरीच्या बोराने रामही बाटला होता

हा कसा अवेळी अंधार पसरला आहे
सूर्य वटवाघळांनी दिवसा झाकला होता

ढोंग पावित्र्याचे जेव्हा उघडे पडले
माझाच चेहरा तेव्हा मलाच हासला होता

क्षुद्रापरी चिरडतात हे मानवी जीवाला
पाहून रौद्र इथले शैतान लाजला होता

ठाऊक मजला आहे पैसा धुळीतला मी
न ठोकरून त्यांनी माझा मान राखला होता

आता बटीक कायद्याकडून नाही कसली अपेक्षा
पाय चाटी तुमचे तो सर्वात लाडला होता

धार आहे म्हणता शब्दांना तुम्ही माझ्या
माझ्याकडे स्वत:च्या जीवनाचा दाखला होता

अभिजित...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: