इथे कोण कधी कोणाचा होता
जो तो फक्त आपला एकट्याचा होता !
रिकामा रिकामा प्याला वाटतो हा
दोष यात थरथरत्या हाताचा होता !
कसा पाय जमिनीवर राहणार ठाम
मोह असा त्या एका क्षणाचा होता !
सुख दुसर्याचे पाहवेना का त्यांना
बांधला जरी इमला कष्टाचा होता !
मी धूर्त, मूर्ख, होतो कातडीबचाव, की
चुकला कोन तुमच्या बघण्याचा होता !
मला सांगण्याची, वाटली लाज तुम्हा
धक्का इतका पुरेसा अपमानाचा होता !
दुखर्या जखमांचे मला काय कौतूक
एकेक घाव आता सरावाचा होता !
अभिजित...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा