बुधवार, ७ मे, २००८

व्यक्तीरेखा

एका भाकरीच्या तुकड्यासाठी
धडपड करावयाची...
अन स्वत:ची ओळख कुरवाळतांना,
समाजाला हवी असलेली
व्यक्तीरेखा रेखाटयाची.

मात्र का... का शोधावं...
नसलेल्या प्रश्नाचं उत्तर काय
मनात जोपसलेली... वाढवलेली...
उघड्या डोळ्यांनी पाहीलेली...
त्या व्यक्तीरेखेचे मग काय?

अहंकार सुखावयाचा फक्त
मनातुन मोठ व्हायंचं नसतं...
मोठ होतांना समाजात
तसच रहायच नुसतं.

मग शिकायचं कसं
लोकांच्या हक्कांना मारायचं,
अन त्यांच्याच समोर मिरवतांना
एकांतात मेलेल्या मनावर नाचायंचं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: