स्वप्नी उडतांना तोंडघशी पडायचे,
ते दिवस भारावलेले असायचे...
तीच्या प्रेमात एकट्यानेच् पडतांना
उगीचच् विषय 'बॅक' ठेवायचे !
उद्याची कसलीच् काळजी नसायची,
आज 'कॉमनऑफ'ची सोय करायची...
'टेंशन' मात्र भारी असायच...
एकेका विषयाच्या 'व्हायव्हाय'चे !
'कॅम्पस'बाहेर टपरीवर सर्व जमले
एका 'कटींग'मध्ये विश्व समावले...
अस्तित्व नसलेल्या प्रेमप्रकरणाचे
चोथा होइतोवर स्वप्न रंगवायचे !
सर्वांना सर्वांचा इतीहास माहिती,
'बॅक', 'डीसी'ची गणित भूमिती...
बाकी चेहर्यावर अनोळखी भाव
प्रत्येकाच असच् अवघड असायचे !
ती 'क्लीअर' होऊन मोकळी झाली,
अन लग्नाच्या 'मार्केट'मध्ये आली...
आम्ही मात्र विषयाच्या 'टिम' सह
चार चार ओळखपत्र संभाळायचे !
परीक्षा थोडी सिरीयस घेतली,
तर तीची लग्नपत्रिका आली...
एकाग्रतेने त्या पत्रिकेत कसे
विषयांचे 'सिलॅबस' शोधायचे ?
मग् 'डिग्री' झाली कॉलेज संपलं,
आयुष्यातलं एक पर्व मागे पडलं...
ऍकेडमी करिअर 'ब्राईट' म्हणुन
नौकरीसाठी झेंड्याखाली लढायचे !
'त्याच्या'सोबत तुलना व्हायची
अजुनही मनात ती असायची...
तो 'रेडीमेड' मिळालेला तरीही
आपण स्पर्धेत पळत सुटायचे !
मनाचं दगड व्हायला लागतं,
जगाच्या कलेनं कसब गावतं...
जगाच्या बाजारात भाव कळल्यावर
दगड सोन्याच्या भावात विकायचे !
उशीरा का होइना जागं व्हायचं,
अन दगड विकायला शिकायचं...
तीच्याविनाही एक जग असतंच्
हे आयुष्याला निक्षुन समजावयाचे !
निलय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा