बुधवार, २१ मे, २००८

गांधीजींच्या डोक्यावर केसं उगवले !

माझी नुकतीच मायक्रोसॉफ्टच्या प्रोजेक्टसाठी अमेरीकेची वारी झाली... येतांना काही 'डॉलर' आणले. आमच्या 'सौ' व पाच वर्षाचे चिरंजीव आदित्य कौतुकाने ते अमेरिकेच्या 'नोटा' न्याहाळत होते... आदु परत परत त्या नोटा निरखून बघायचा... एक नोट झाली कि दुसरी... दुसरी झाली कि तिसरी. मला रहावले नाही अन आदुला विचारलं,"बेटा, त्या सर्व नोटा सारख्याच आहेत, त्यात एवढे पहाण्यासारखे काय?"... "बाबा, मला कळत नाही की गांधीजींच्या डोक्यावर केसं कसे काय उगवले"... मी डोक्याला हात मारला, डॉलरवर वॉशिंग्टनचे चित्र होते.

निलय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: