मी एकटा होतो...
मी एकटा होतो अन् तिथेच बरा होतो !
माझ्यातला मी फक्त तेव्हढा खरा होतो !
मुखवटे नव नवे या दुनियेत अनोळखी..
पाहतांना आरसा तोच जुना चेहरा होतो !
कैफ भिनले नसात यश माजल्याने..
अताशा कोठे ऊठून सावरलो जरा होतो !
पालखी नित्याने निघे त्याची अन् दिंडी..
तरी कशास तो कोणाचा आसरा होतो ?
झालो कधी नकळत मोहात बंदीस्त..
मुक्त मनाचाही मग कसा पिंजरा होतो !
कोण असतं कोणाचं जगाच्या पाठीवर ?
समजलो जे आपले त्यांना उपरा होतो !
- निलय
मी एकटा होतो अन् तिथेच बरा होतो !
माझ्यातला मी फक्त तेव्हढा खरा होतो !
मुखवटे नव नवे या दुनियेत अनोळखी..
पाहतांना आरसा तोच जुना चेहरा होतो !
कैफ भिनले नसात यश माजल्याने..
अताशा कोठे ऊठून सावरलो जरा होतो !
पालखी नित्याने निघे त्याची अन् दिंडी..
तरी कशास तो कोणाचा आसरा होतो ?
झालो कधी नकळत मोहात बंदीस्त..
मुक्त मनाचाही मग कसा पिंजरा होतो !
कोण असतं कोणाचं जगाच्या पाठीवर ?
समजलो जे आपले त्यांना उपरा होतो !
- निलय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा