मंगळवार, ६ मे, २००८

मनोगत...!

मी कोण...? तसा साधा सुधाच... अगदी सामान्य, म्हनायला इंजीनीयर (?)... चांगला गलेलठ्ठ पगार असलेला... लोकांच्या नजरेत यश मिळवलेला... पण खरं सांगायचं म्हणजे स्वतःच्या मनातुन पार वाया गेलेला... कधीतरी भावना होत्या… हृदय होतं... पण मानुस नव्हतो... तेव्हा यांच्या नजरेत नव्हतो... विश्वात नव्हतो. आज चूकुन मानुस झालो अन कळायला लागल की आता जग ऐकायला लागलयं... कदाचीत जगाला संवेदना नसतील... मग, मग... माझ्याही संवेदना बोथट झाल्या असतील जगाच्यासोबत... म्हणुनच मला हे जग कळायला लागलं असेल, कदाचीत!
आज माझासारखा प्रत्येक 'तो' गुलाम आहे... दास आहे... या परिस्थीतीचा... स्वत:च्या आकांक्षेचा... इच्छेला न विचारता थोपविलेल्या कदाचीत आपण किंवा आपल्याच लोकांनी लादलेल्या ध्येयामागे मन घट्ट करकचुन आवळून... धावायचे. मनाची हाक मात्र मनाच्या तुरुंगात गुदमरुन शेवटचे आचके घेत रहातं... मन वारंवार सांगण्यचा प्रयत्न करतो की बाबा रे! ज्या मागे धवतोय ते मृगजळ आहे अन हे मृगजळ मिळाल्यानंतर बघ मग कशी पोकळी निर्माण होते... उध्दीष्टहीन... अस्तीत्वहीन... मित्रहो! आज मान्य करु की आपल्यालाही मुळी जगायचं नसतं... फक्त मृगजळ हवं असतं, कदाचीत...

निलय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: