मंगळवार, ६ मे, २००८

बालपणीची आठवण...

असाच office मध्ये थोडी सवड होती तेव्हा mails check करत होतो, बाळ्याचे mails चाळतांना ASQ चे snaps बघुन गहिवरुन आले. ते दिवस किती सोन्याचे (Golden days) होते ते आता कळतं. Struggles च्या आपण सर्वच बाता मारतो पण आज आपल्यातला प्रत्येकजण professional झाला आहे आणी तेच यश म्हणुन मिरवतो!

ते out झाल्यावर मनीषचे देवळामागे जावुन रडने... ते राजुचे colony तील best bowler (बाळू) विरुध्द खुन्नस पणे batting करणे... गणपतीतील Cricket match जिंकण्यासाठी प्राण पणाला अन प्रतिष्ठा लावणे... मला वाटतं ते spirit होतं आयुष्याकडे बघण्याचा अन जगाकडे... स्वत:च्या positive attitude व्यक्तीमत्वेचा... आज अस्तित्वच हरवलेलं आहे, कोण्या Boss च्या पायाशी एका increament साठी गहाण पडलेलं... धुळीने माखलेलं... असहाय्य...!

कशाला मी असं बोलतोय... दहा वर्षापुर्वी पेटीबंद केलेल्या त्या 'मी' ला का जागवण्याचा प्रयत्न करतोय... बाळूचे snaps बघतांना एका फोटोत एक घर पाहिलं, चिरे गेलेले... रंग उडालेले... भिंती खचलेल्या... थोड निरखुन पाहीले तर त्यावर लिहीले होते 'ASQ 4' अन वाटलं की याच घरांच्या अंगा-खांद्यावर खेळलो, बागळलो... या परीसरात वाढलो, मोठे झालो... याच वातावरणात संस्काराने मढवले गेलो...!

पण आज काय आहे... त्या ASQ Quarters ला आपण सर्व परके झालो आहोत आणी आपल्यावाचुन ते ४० घरंसुध्दा पोरके झाले आहेत! चला तर आपण सर्व एकदा ASQ ला भेटूया आणी कोजागीरी करु व पोरक्या झालेल्या ४० घरांना एकदा त्यांच्या गतवैभव आठवण करुन देवू!

पत्ता - निलय, ASQ २६,
गोपाल टेकडी, CRS Quarters (वरची कॉलनी)

निलय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: