मरायचे म्हणतो मी जगून काय करू - निलय
मरायचे म्हणतो मी जगून काय करू,
सरायचे म्हणतो मी उरून काय करू.
शांत शांत अशांत मनाच्या दालनात...
ऐकायचे म्हणतो मी बोलून काय करू.
ध्येय मृगजळ आयूष्यही मृगजळच...
परतायचे म्हणतो मी धावून काय करू.
कोणास तसदी माझी कोणाला गरज?...
निघायचे म्हणतो मी थांबून काय करू.
प्रमाण आणू कोठून माझ्या असण्याचे...
हरवायचे म्हणतो मी जपून काय करू.
ऋणानुबंध नको शल्य बोचरे किती...
सुटायचे म्हणतो मी रुतून काय करू.
अर्थ कुठे जाणिवांना सांगून थकले...
विरायचे म्हणतो मी दिसून काय करू.
मरायचे म्हणतो मी जगून काय करू,
सरायचे म्हणतो मी उरून काय करू.
शांत शांत अशांत मनाच्या दालनात...
ऐकायचे म्हणतो मी बोलून काय करू.
ध्येय मृगजळ आयूष्यही मृगजळच...
परतायचे म्हणतो मी धावून काय करू.
कोणास तसदी माझी कोणाला गरज?...
निघायचे म्हणतो मी थांबून काय करू.
प्रमाण आणू कोठून माझ्या असण्याचे...
हरवायचे म्हणतो मी जपून काय करू.
ऋणानुबंध नको शल्य बोचरे किती...
सुटायचे म्हणतो मी रुतून काय करू.
अर्थ कुठे जाणिवांना सांगून थकले...
विरायचे म्हणतो मी दिसून काय करू.
- निलय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा