पानिपत युद्ध: एक प्रतिक्रीया
(टिपः हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये सुरेश भटेवरा यांनी 'पानिपतचे अमर मराठे!' या सदराखाली लिहीला - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5110790.cms)
पानिपतच्या लढाईत १७६१ मध्ये सदाशिवराव भाऊंबरोबर लढलेली २९८ कुटुंबे त्या पराभवानंतरही तेथेच राहिली. आज २४९ वर्षांनी त्यांची संख्या लाखावर गेली आहे. हरयाणात विधानसभा निवडणूक कव्हर करताना पानिपत लागले आणि तेथेच या कुटुंबांशी भेट झाली. परप्रांतीयांना शिवीगाळ करून पिटाळण्यातच सारे शौर्य सामावले आहे, असे मानणाऱ्यांना एकदा हरयाणात नेले पाहिजे आणि त्यांची या मर्द मराठ्यांशी गाठ घालून दिली पाहिजे...................
हरयाणात विधानसभेची निवडणूक कव्हर करताना वाटेत पानिपत लागले. इथे अडीचशे वर्षांपूवीर् मराठे आणि रोहिले अफगाण यांच्यात घनघोर युद्ध झाले व त्यात मराठी फौजांचा पराभव झाला, हा इतिहास सर्वांनाच परिचित आहे. प्रत्यक्ष पानिपतचा फलक पाहिला, तेव्हा मनात ऐतिहासिक स्मृतींचे रोमांच उभे राहिले. १४ जानेवारी २०११ रोजी या संग्रामाला २५० वषेर् पुरी होतील. महाराष्ट्र आणि हरयाणात या निमित्ताने परस्पर स्नेहबंधांचा नवा सेतू बांधला जावा, अशी धडपड काही उत्साही मराठी जनांन चालवली आहे.
हरयाणात पोहोचण्यापूवीर् अचानक नवी माहिती हाती आली. सदाशिवराव भाऊंबरोबर युद्धात सहभागी असलेली २९८ मराठी कुटुंबे, पराभवानंतर हरयाणातच राहिली. गेल्या २४९ वर्षांत त्यांच्या वारसांची संख्या दहा लाखांवर पोहोचली आहे. 'जैसा देश वैसा भेस' या तत्त्वानुसार कालौघात या सर्वांनी हरयानवी संस्कृती अंगिकारली. पवारांचे पनवार, महालेचे महल्ले, महालान, जोगदंडांचे जागलान अशी आडनावेही बदलली. बहुतेकजण आज जाटांसारखेच दिसतात. तरी ही मूळ मराठी संस्कृतीचा आजही सर्वांना जाज्वल्य अभिमान आहे. यापैकी अनेकजण स्वत:च उल्लेख आवर्जून मराठा चौधरी करतात. हरयाणात या समाजाला 'रोड मराठा' म्हणतात. संस्कृती जपण्यासाठी हा समाज आपसात रोटी-बेटी व्यवहार करतो.
पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरूक्षेत्र भागात जवळपास दोनशे गावांमध्ये हे मूळचे मराठी उत्तम शेती करतात. कुरूक्षेत्राच्या पुंडरी मतदारसंघात, 'रोड मराठां'ची संख्या लक्षणीय आहे. समाजाचे नेतृत्व करणारे चौधरी ईश्वरसिंग पुंडरीतून चारदा विधानसभेवर निवडून आले. १९९१ ते ९६ या कालखंडात विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. २००० साली त्यांचे सुपुत्र तेजवीरसिंग अपक्ष उमेदवार असूनही जिंकले.
पानिपतच्या युद्धाबाबत हे मराठीजन कमालीचे संवेदनशील आहेत. त्यांंच्यापैकी अनेकजण युद्धात सदाशिवराव भाऊंनी कसा पराक्रम गाजवला,अखेरपर्यंत ते किती त्वेषाने लढले, रणांगणावर विश्वासरावांना गोळी कशी लागली, याचा सारा इतिहास कालपरवा घडलेल्या घटनेसारख्या सांगतात. या मराठी भाईबंदांना भेटण्यासाठी महामार्गाला लागूनच असलेल्या रोड मराठा समाजाच्या धर्मशाळेत शिरलो. तिथे मराठा नरेश ऊर्फ प्रताप चौधरी (जागलान)ची भेट झाली. या उत्साही तरुणाने छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली असून तिचे ऑफिस धर्मशाळेतच आहे. नरेश म्हणतो, कुरूक्षेत्राच्या ज्या भूमीवर महाभारताचे युद्ध घडले त्या जागेला राज्य सरकारने वॉर मेमोरिअलचा दर्जा दिला. स्मारक सुंदर बनवून पर्यटनस्थळात त्याचे रूपांतर केले. असेच स्मारक पानिपत युद्धाचेही का नसावे? उत्तरेत मराठ्यांनी अहमदशाह अब्दाली व रोहिल्यांशी झुंज देताना कडवी झुंज देताना मराठी फौजांना आलेले वीरमरण व त्यांच्या शौयाची गाथा त्यामुळे देशाला कळेल.
नरेश सांगतो की, पानिपतच्या रणभूमीवर हे स्मारक साकारण्यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आमची मागणी आहे. संस्थेतफेर् त्याचा सतत पाठपुरावाही चालवला आहे. पानिपतचे माजी जिल्हाधिकारी अजित जोशी सध्या सोनपतमध्ये सनदी सेवेत आहेत. त्यांनी पानिपत फौंडेशनची स्थापना केली होती. हे फौंडेशन दरवषीर् डिसेंबरात पानिपत महोत्सव करते. भारतीय पुरातत्व विभागातले तरुण अधिकारी ओंकार गरूड म्हणतात की, जाट आणि मराठी जनतेचे ऋणानुबंध जुने आहेत. तीस-चाळीस वर्षांपूवीर् महाराष्ट्रातल्या विटा, खटाव, सांगली, खानापूर, आटपाडी भागातले मराठा बांधव याच संबंधांच्या आधारे पानिपतला आले आणि सोने-चांदी गाळण्याचा व्यवसाय करत इथे स्थिरावले. आता त्यांची महाराष्ट्र ज्वेलर्स, खटाव ज्वेलरी, ज्योतिलिर्ंग रिफायनरी, जय शिवाजी ज्वेलर्स अशी दुकाने पानिपतच्या रस्त्यांवर दिसतात.
पानिपत युद्धाविषयी अभ्यासकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. सदाशिवराव भाऊंच्या अहंकारी स्वभावामुळे पराभव पत्करावा लागला. भाऊंचे निकटवतीर् बळवंतराव मेहेंदळे या अविचारी सरदाराला मराठा दौलतीतील शिंदे-होळकरांचे वर्चस्व मान्य नव्हते. या मेहेंदळ्यांच्या सल्ल्याला भाऊंनी वेळोवेळी अवास्तव महत्त्व दिले. शिंदे-होळकरांच्या मनात त्यामुळे अढी निर्माण झाली. सूरजमल जाटासारख्या मित्राचा आधार भाऊंनी गमावला. मेहेंदळ्यांऐवजी भाऊंनी त्याचा सल्ला ऐकला असता तर कदाचित पराभव पाहावा लागला नसता. अवघ्या चार-पाच दिवसात दिल्ली भाऊंनी सर केली. तेव्हा तिथे कोणीही बादशहा नव्हता. शाह आलम या चौदा वर्षांच्या बादशहाच्या मुलाला भाऊंनी तख्तावर बसवले. यावेळी दिल्लीची वजिरी गाजुदी खानाकडे सोपवावी, असा आग्रह सूरजमलने भाऊंकडे धरला. शिंदे-होळकरांचे मतही तेच होते. मात्र, मेहेंदळेंनी भाऊंना नारोशंकरांना ही वजिरी देण्यास भाग पाडले. अशा काही नकारात्मक नोंदी असल्या तरी उत्तरेतली मोहीम फत्ते व्हावी, यासाठी भाऊंनी अहोरात्र उपसलेले कष्ट आणि नेटाने चालवलेले काम याचे महत्त्व कमी होत नाही. वस्तुत: पानिपतावरही मराठ्यांची आधी सरशी होत होती पण नंतर स्थिती बदलली. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांना इथे पठारावर गोलाईचे युद्ध लढावे लागले. त्यात विनाकारण जड तोफा वापरल्याचा आरोपही भाऊंवर केला जातो. युद्धात निसर्गही मराठी फौजांना नडला. दक्षिणायनामुळे सूर्याची किरणे थेट डोळ्यावर पडणे, तोफांच्या भडिमाराचा दुर्गंधीयुक्त वारा मराठ्यांच्या दिशेने वहाणे, अशा गोष्टींमुळे रणभूमीवर प्रत्यक्ष काळही मराठ्यांची परीक्षा पाहात होता.
कारणे काहीही असोत, पराभव झाला हे खरे. मात्र, पेशव्यांना त्या काळात हिंदुस्थान जिंकण्याची महत्त्वाकांक्षा मनात बाळगावीशी वाटली, याचा सार्थ अभिमान मराठीजनांना का वाटू नये? यश अपयश कोणाच्या हाती नसते. पराभव झाला म्हणजे सारे संपले, असा निष्कर्ष काढणेही चुकीचेच. दुदेर्वाने पानिपत म्हणजे लाजिरवाणा पराभव, असा पर्यायी शब्द अथवा वाक्प्रचार महाराष्ट्रात रूढ झाला आहे. मराठा दौलतीसाठी युद्धभूमीवर पराक्रम गाजवून स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या हौतात्म्याचे ऐतिहासिक महत्त्व नाकारणे, हा शुद्ध करंटेपणा नव्हे तर काय? इतिहासाच्या तपशीलांविषयी आस्था नसलेल्यांची ही विकृत मानसिकता म्हणावी लागेल. महाराष्ट्राबाहेरच्या उर्वरित भारताला तुच्छ लेखणाऱ्याच्या संकुचित मनोवृत्तीचेही ते बोलके प्रतीक आहे. दिल्ली महाराष्ट्राला अपमानास्पद वागणूक देते, मराठी जनांविषयी हिंदी भाषिक राज्यांना आस्था नाही, अशी कोल्हेकुई महाराष्ट्रात सतत ऐकू येते. राज्याच्या विद्यमान राजकारणात भाऊंसारख्या पराक्रमी योद्ध्याचे वंशज किती? असा प्रश्ान् हरयाणातल्या रोड मराठ्यांनी विचारला की मनोमन हसू येते. परप्रांतियांच्या द्वेषाने पछाडलेल्यांनी सव्वा दोनशे वर्षांपूवीर्च वेडा अन् अहंकारी ठरवून भाऊंच्या स्मृतीला महाराष्ट्रात मूठमाती दिली हे त्यांना कसे समजावून सांगणार?
हरयाणात आपली मूळ संस्कृती अभिमानाने जपणाऱ्या रोड मराठ्यांना आजही कोणी परप्रांतीय मानत नाही. आपल्या राज्यात चालते व्हा, असेही त्यांना कोणी म्हणत नाही. महाराष्ट्रात मात्र कामधंद्यासाठी आलेल्या परप्रांतीयांना शिवीगाळ करून पिटाळण्यातच सारे शौर्य सामावले आहे, असे मानणाऱ्यांना एकदा हरयाणात नेले पाहिजे. हरयानवी संस्कृतीत स्वत:ला विलिन करतांनाही आपली मूळ मराठी संस्कृती ज्यांना आजही जतन करावीशी वाटते, त्यांची भेट घालून दिली पाहिजे. पानिपतात मराठी फौजांचे नेतृत्व करणाऱ्या सदाशिवराव भाऊंचे चिरंतन स्मारक व्हावे, यासाठी अनेक स्तरांवर सध्या प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने उभय राज्यात सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल, हरयाणा आणि महाराष्ट्र परस्परांच्या अधिक जवळ येतील. पानिपतात हिंडतांना याचा नक्कीच प्रत्यय येतो
एक विचार - हरयाणात कोणी मराठी राजकारणी इतीहासातील मराठी अस्तीत्वाला भावनीक हात घालून राजकीय खेळी खेळत नाही, एवढं भान वृत्तपत्रांनी ठेवलं तरी मिळवलं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा