हातचं न राखता बडबड करणारी,
आपल्याला एखादी मैत्रीण असावी...
मैत्रीणीच्या घोळक्यातुन जातांना
हटकून मागे वळून बघणारी...
स्व:च्या 'असाइंमेंट्स'ची वही
न चुकता पहीले आपल्याला देणारी...
आपल्याला एखादी मैत्रीण असावी...
कधी रस्त्यात मैत्रीणीच्या गाडीवर भेटली
तर उतरुन आपल्यासोबत घरी येणारी...
एके दिवशी क्लासला गेलो नाही तर
क्लासमधे थोडीशी 'अपसेट' होणारी...
आपल्याला एखादी मैत्रीण असावी...
पिक्चरचा मुड झाला तर्
आपल्यालाच पिक्चरला चल म्हणनारी...
कोणी बघीतलं जरी दोघांना एकत्र
डोळ्यात पहात आपला हात धरणारी...
आपल्याला एखादी मैत्रीण असावी...
लग्नात नवर्यासोबत असतांना
'जेवलास का?' म्हणुन विचारणारी...
हाक मारुन 'डायस'वर बोलावत
'माझा मित्र' म्हणून ओळख करुन देणारी...
आपल्याला एखादी मैत्रीण असावी...
निलय...
३ टिप्पण्या:
Ekdum mast kavita ahet.
evdhya busy schedulemadhun kavita kartay mhanje sadhyachi line chukliye asa vattay. tyapeksha full time kavi jhalat tar aamhala ajun changlya kavita miltil. Ani marathi sahityala ek changla navkavi milel.
athishay chan aahe kavita khupch chan rekhatal aahe aapan aprtim
Thanks
टिप्पणी पोस्ट करा