वार्यात थोडा कोरडेपणा होता...
कदाचीत ओलसरपणा सुध्दा असावा...
माहीती नाही...
हेलकावे मनाला लागतायेत...
कदाचीत शरीराला सुध्दा लागत असावे...
माहीती नाही...
तीच्या डोळ्यात आसवं होती..
कदाचीत ती आलीही नसावी..
माहीती नाही...
अस्पष्टच कुजबूज 'चांगला होता'...
कदाचीत मोठ्याने गलकाही असेल..
माहीती नाही...
मला काहीच करायचं नव्हतं...
कदाचीत संदर्भ राहीला असेल...
माहीती नाही...
माझी अंत्ययात्रा चालली...
कदाचीत सत्कार सोहळा होता...
माहीती नाही...
निलय...
1 टिप्पणी:
agadi surekh
hats off to you.....
टिप्पणी पोस्ट करा